दैनिक
दिव्य मराठी
बीड जिल्हा
रविवार दि. ५ एप्रिल २०१५
सोमवार दि. ६ एप्रिल २०१५
संमिश्र पान क्र. ४
झुंजार नेता
सोमवार दि. ६ एप्रिल २०१५
पान १ वरुन........
आयुक्त श्री उमाकांत दांगट यांनी स्वतः गढ़ी येथे भेट दिली. त्यांच्या हस्ते प्रविण काळम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बीड जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, प्राथ.शिक्षणाधिकारी सुखदेव सानप, माध्य.शिक्षणाधिकारी लता सानप, गेवराईचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी गणेश सावंत उपस्थित होते.
सकाळ
बीड TODAY
शनिवार दि. ४ एप्रिल २०१५
दैनिक लोकमत हॅलो बीड रविवार दि.५ एप्रिल २०१५
शिक्षकच खरी पिढी घडवतात
आधार विद्यार्थी सहाय्यता प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गेवराई : शिक्षक हे खरे पिढी घडवत असतात. आपला विद्यार्थी कधी मोठा होईल त्यात त्यांचा आनंद असतो. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी येथील आधार विद्यार्थी सहाय्यता प्रकल्प खर्या अर्थाने काम करत असून, त्यांचे कार्य कौतूकास्पद आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, शिक्षण अधिकारी सुखदेव सानप, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गेवराईचे गटविकास अधिकारी गणेश सावंत, जेष्ठ गटशिक्षणाधिकारी मिलिंद तुरूकमारे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रवीण काळम हे उपस्थित होते.
येथील जि. प. च्या सर्व शिक्षकांनी मिळून आधार प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत २७ लाख रूपयांचा निधी लोकसहभागातून जमा करण्यात आला. यात १00 टक्के इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच २0 हजार रोपवाटिका स्वत: तयार करून त्यांचे सर्व शाळेमध्ये वृक्षारोपण होणार आहे. १६ हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळ चित्रकला स्पर्धा या आधार प्रकल्पांतर्गत घेण्यात आली. असे विविध उपक्रम राबवणार्या आधारचे कौतूक करण्यासाठी व आधार विद्यार्थी सहाय्यता प्रकल्प गुण गौरव सोहळा या कार्यक्रमात घेण्यात आला. हा कार्यक्रम गढी येथील नवोदय विद्यालयात संपन्न झाला.
आधार प्रकल्पच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन तसेच माझा भारत देश या माहिती फलकाचे उद््घाटन झाले. जि. प. च्या शाळेत शिक्षण देणार्या अनेक मातांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रवीण काळम यांनी केले. सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. (वार्ताहर)
No comments:
Post a Comment